सांडपाण्याच्या विळख्यात आला शेलु गावातील तलाव

गाव तलाव नाहीतर परिसरातील सहा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वर्षभर सांडपाणी साचून राहत असल्याने जमिनी नापीक होण्याची भीती व्यक्त केली जाते
सांडपाण्याच्या विळख्यात आला शेलु गावातील तलाव

कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायत मधील शेलु गावातील गावतलाव सांडपाण्याच्या विळख्यात सापडला आहे. तेथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या भगवान शंकर मंदिराचे मागे असलेल्या गवतलावात परिसरात झालेल्या लोकवस्तीचे सांडपाणी वाहून जात असते. शेलू रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या सर्व लोकवस्ती मधील सांडपाणी त्या भागात सोडून देण्यात आले असून केवळ गाव तलाव नाहीतर परिसरातील सहा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वर्षभर सांडपाणी साचून राहत असल्याने जमिनी नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेलू ग्रामपंचायत मधील ग्राम तलाव तीन वर्षापूर्वी शासनाचा निधी खर्च करून गाळ काढून स्वच्छ केला होता. गाव तलावामधून तब्बल दोन हजार ब्रास गाळ बाहेर काढून तलाव खोल करण्यात आला होता.तर त्यानंतर तलावामध्ये पाण्याचा साठा होऊन त्या परिसरात असलेल्या विहिरींची पाण्याची भूजल क्षमता वाढून पाण्याचा साठा निर्माण झाला होता. मात्र यावर्षी वेगळीच समस्या ग्रामस्थांना भेडसावत असून शेलु गावाचे भूषण आणि त्या गावचे ग्रामदैवत असलेल्या शिव मंदिराच्या बाजूचा तलाव यावर्षी दूषित पाण्याचे हिरवागार तवंग तेथे निर्माण झाले आहे. मात्र जून महिना अर्धा झाल्यावर ग्रामस्थांना त्या तलावात नैसर्गिक पाणी नाहीतर सांडपाणी साचले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ तसेच त्या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेलू रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या राहिलेल्या इमारती मधील ते सांडपाणी कुंपणाबहेर सोडल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्या सांडपाण्याच परिणाम तेथील शेत जमिनीवर देखील झाला असून परिसरात हिरवेगार जंगल तयार झाले आहे. याबाबत महिला शेतकरी शेवंता एकनाथ डांगरे यांच्याकडे तक्रारी दिल्या असून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट आणखी मोठ्या प्रमाणत त्यांच्या शेतजमिनीतून सांडपाणी वाहून जाण्याची प्रक्रिया सुरूच आहे. गावाचे ग्रामदैवत मंदिराच्या बाजूचा असलेला तलाव सांडपाण्यामुळे दूषित झाल्याने गावातील इमारती मधून निघणारे सांडपाणी तलावात येत असल्याने तेथील पाणी दूषित होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in