हप्ता न दिल्याने जमीनमालकाचे कार्यालय फोडले; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी जमीन मालकाने माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हप्ता न दिल्याने जमीनमालकाचे कार्यालय फोडले; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी : शहरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने दादागिरी केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे. हप्ता स्वरूपात ५ लाख रुपये न दिल्याने संतप्त झालेल्या माजी नगरसेवकाने आपल्या माणसांसह जमीन मालकाला शिवीगाळ करून त्याचे कार्यालय जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकले आहे. याप्रकरणी जमीन मालकाने माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील सोनीबाई कंपाऊंड येथे राहणारे शिवकांत पांडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नारपोली परिसरात खरेदी केली होती. ज्यावर हे लोक त्यांची वाहने पार्क करत असत. या जमिनीवर परिवहन कार्यालय सुरू करण्यासाठी ५ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता तयार कंटेनर केबिन आणून ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपी पाच जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ५ लाख रुपये दे नाहीतर कार्यालय उघडू देणार नाही, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ७ जानेवारी रोजी सकाळी पैसे न दिल्याने त्यांनी शिवीगाळ करत जेसीबीने कंटेनरची केबिन फोडली. नारपोली पोलीस ठाणे गाठून भिवंडी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास बाळू पाटील, वीरेंद्र पाटील, निखिल विकास पाटील, रोहन कैलास पाटील, जतीन विकास पाटील, वैभव वसंत पाटील, बंटी साळुंखे, दिनेश सुरेश भोईर आणि जेसीबीच्या चालक अशा ९ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in