डोंबिवलीतील उद्यान आणि नाना-नानी पार्क चोरीला ; पोलीस उपायुक्तांना पत्र

एका विकासकाने दोन वेगवेगळ्या विकासकांना टी.डी.आर देण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागाकडून केल्याचा आरोप
डोंबिवलीतील उद्यान आणि नाना-नानी पार्क चोरीला ; पोलीस उपायुक्तांना पत्र

नागरिकांसाठी आरक्षित असलेल्या उद्यान, मनोरंजनाचे मैदान ( आ.क्र,RG-97 ) नानी-नानी पार्क ( स.क्र.९९/१/ ह ) या जागा गिळकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. २०१७ पर्यत अस्त्विवात असणारे नाना-नानी पार्क इतर ठिकाणी हटविण्यात आले. एका विकासकाने दोन वेगवेगळ्या विकासकांना टी.डी.आर देण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागाकडून केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी केला आहे. डोंबिवलीतील उद्यान आणि नाना-नानी पार्क चोरीला गेल्याचा अर्ज पेडणेकर यांनी पोलीस उपायुक्तांना केला आहे. तसेच महसूल विभागाकडेहि लेखी अर्ज केला आहे.

याबाबत भाजपचे माजी नगरसेवक पेडणेकर यांनी प्रशासकीय संस्थाना दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि, नागरिकांसाठी आरक्षित असलेले उद्यान ( आ.क्र,RG-97 ) नानी-नानी पार्क (स.क्र.९९/१/ ह ) विकासकाने देणे आवश्यक होते. बाजूकडील साई राज पार्क नावाच्या इमारतीच्या भूखंडावर मनोरंजनाचे मैदान (आ.क्र,RG-97) आरक्षित होते. त्या बदल्यात विकासकाने महापालिकेस कागदोपत्री १५ गुंठे आकारमानाचे `भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान` विकसित करून महापालिकेस हस्तांतरित केले. महापालिकेच्या मालमत्ता विभागातही एकूण १५ गुंठे आकारमानाच्या भूखंडाची ताबा-पावती बनविण्यात आली. परंतु प्रत्यक्षात जागेवर मोजणी केली असता उद्यान फक्त ९ गुंठे इतक्यात आकारमानाचे भरले. येथेही महापालिकेची फसवणूक केली असून एक टी.डी.आर. घोटाळा असल्याचा आरोप माजी नगरसेवक पेडणेकर यांनी केला. न्यू आयरे रोड वरील अंबिका धाम सोसायटी समोर उद्यानासाठी आरक्षित असणाऱ्या ( आ.क्र.५४ ) भूखंडावरहि विकासकाने अश्या प्रकारे एकूण १० गुंठे आकारमानाच्या भूखंडावर उद्यान विकसित करण्याचे मान्य केले होते. त्याचा मोबदलाही विकासकाला मिळाला परंतु सदर भूखंडाचे सीमांकन करून भूखंड प्रत्यक्षात महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे टाळत आहे. सध्या विकासकाने आरक्षित १० गुंठे उद्यानाच्या भूखंडावर बांधकाम सुरु केले आहे. या कामी वर्षानुवर्षे मालमत्ता व नगररचना विभागातील अधिकारी लक्ष देत नाहीत का असा प्रश्न माजी नगरसेवक पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांना महापालिकेच्या वतीने मिळालेल्या सुविधांपासून नागरिक वंचित राहू नये यासाठी आयरे रोड येथील अंबिका धाम सोसायटी समोर २५ व २६ असे दोन दिवस नागरिकांसह लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक पेडणेकर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in