ठाकरेंच्या सभांमध्ये माजी नगरसेवकासह तीन पदाधिकाऱ्यांच्या खिशावर डल्ला

लोकसभा दौऱ्यावर असलेले उध्दव ठाकरे यांनी दुपारी एक वाजता अंबरनाथ पूर्वेतील टिळकनगर शाखेचे उद्घाटन केले.
ठाकरेंच्या सभांमध्ये माजी नगरसेवकासह तीन पदाधिकाऱ्यांच्या खिशावर डल्ला

उल्हासनगर : कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असलेल्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अंबरनाथ पूर्वेतील चौक सभेमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत अनेक खिसेकापू आणि पाकीटमार चोरही सक्रीय असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ येथील एका माजी नगरसेवकासह तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या खिशावर चोरांनी डल्ला मारत जवळपास ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. मात्र याप्रकरणी पोलिसात कुठलीही तक्रार नसली तरी पाकीटमारांमुळे पदाधिकाऱ्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शनिवारी कल्याण लोकसभा दौऱ्यावर असलेले उध्दव ठाकरे यांनी दुपारी एक वाजता अंबरनाथ पूर्वेतील टिळकनगर शाखेचे उद्घाटन केले. यावेळी उद्घाटनानंतर त्यांनी येथे चौक सभा घेतली होती. या चौक सभेत त्यांना एकण्यासाठी आघाडीच्या तीन्ही पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र उध्दव ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत सोडण्यासाठी आलेल्या अंबरनाथमधील एका माजी नगरसेवकाचे पाकीट आणि त्यातील १८ हजार रुपयांवर चोरांनी हात साफ केला आहे. तर याचवेळी बदलापूर आणि वांगणी येथून आलेल्या आणखी दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या खिशातूनही ११ आणि १६ हजार रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केल्याची माहिती या माजी नगरसेवकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात कुठलीही तक्रार दाखल केली नाही. मात्र या तिघांव्यरिक्त आणखी काही नागरिकांवर चोराची वक्र नजर पडली का असा प्रश्न उपस्थित केला जात आाहे. आगामी निवडणुकांचा हंगाम पाहता होणाऱ्या राजकीय सभांमध्ये सर्वात पहिले खिसेकापूंचा बंदोबस्त करण्याचे काम पदाधिकारी आणि पोलिसांना करावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in