जव्हारमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेने समस्या वाढल्या

दरवाजाची कडी तुटली असल्याने शौचालयाचा वापर करणे अतिशय जोखमीचे वाटत आहे.
जव्हारमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेने समस्या वाढल्या

जव्हार शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून शौचालयाचे दरवाजे निखळले आहेत, तर काही दरवाजांचे कडी आतून बंद होत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यशवंत नगर मोर्चा परिसरात येत असलेल्या बौद्धवाडा या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेकडून सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारे शौचालयांची स्वच्छता व देखभाल आणि दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

महिलांना शौचालयाचा वापर करत असताना दरवाजाची कडी तुटली असल्याने शौचालयाचा वापर करणे अतिशय जोखमीचे वाटत आहे. नगरपरिषदेने या सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करून नागरिकांच्या हितासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत आहेत.

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाल्याचे मला कळाले असून मी याबाबत जव्हार नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.

- विशाखा अहिरे, नगरसेविका.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in