ठाणेकरांना मिळालेले ट्रॅफिकमुक्तीचे आश्वासन हवेत विरले

मुंबई ठाणे परिसरातील भाजपचे खासदार, आमदार यांची एक बैठक १४ मार्च २०२० रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.
ठाणेकरांना मिळालेले ट्रॅफिकमुक्तीचे आश्वासन हवेत विरले

ठाणे शहर आणि परिसरातील ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी गेल्यावर्षी एक अभियान सुरु केले होते. त्याच संदर्भाने दोन वर्षांपूर्वी ठाणे शहरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहर आणि परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून येत्या वर्षभरात ठाणे परिसर ट्रॅफिकमुक्त झालेला असेल अशी ग्वाही त्यावेळी तत्कालीन केंद्रीय जहाजबांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली होती. मात्र या बैठकीला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी अमंलबजवाणी झाली नसल्याने ठाणे शहराच्या ट्रॅफिकमुक्तीचे आश्वासन हवेत विरले असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे आणि परिसरात वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जेएनपीटी, रेल्वे, मेरीटाईम बोर्ड, महापालिका, पोलीस तसेच मुंबई ठाणे परिसरातील भाजपचे खासदार, आमदार यांची एक बैठक १४ मार्च २०२० रोजी ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, भिवंडीचे खासदार आणि सध्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खा. मिहीर कोटेचा, आमदार आणि भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे, आ. संजय केळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग उपस्थित होता. जेएनपीटी परिसरात एक कंटेनर प्लाझा बनवण्यात आला असून एक वेळी दीड हजार कंटेनर उभे रहातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वसई परिसरात एक टर्मिनस बनवण्याचे प्रस्तावित असून ते सुरू झाल्यास घोडबंदरमार्गे येणारी वाहतूक कमी होऊ शकते. डबलडेकर रेल्वेने कंटेनरची वाहतूक करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे एकाचवेळी अनेक कंटेनरची वाहतूक करणे शक्य होणार आहे. असे या बैठकीत सांगण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in