रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाची बॅग वाहतूक पोलिसांना दिली

पोलीस नाईक गणेश आव्हाड यांना रिक्षाचालक कृष्णा पंडीत यांनी बॅगेबाबत सांगितले. आव्हाड यांनी बॅग उघडून पाहिले असता, एक लॅपटॉप व आयपॅड व बँकेची कागदपत्रे मिळून आली.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा प्रवाशाची बॅग वाहतूक पोलिसांना दिली

डोंबिवली : डोंबिवलीतील एका प्रामाणिक रिक्षाचालकाने प्रवाशी बँग वाहतूक पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्याकडे सुपूर्त केली. प्रवासी आपली बॅग रिक्षात विसरला होता. रिक्षाचालक कृष्णा पंडित यांच्या रिक्षात प्रवासी बँग विसरले होते. पोलीस नाईक गणेश आव्हाड यांना रिक्षाचालक कृष्णा पंडीत यांनी बॅगेबाबत सांगितले. आव्हाड यांनी बॅग उघडून पाहिले असता, एक लॅपटॉप व आयपॅड व बँकेची कागदपत्रे मिळून आली.

सदर कागदपत्रांवरून मालकाचा शोध घेतला असता, बॅगेचे मालक दीपज्योती दोईमाळी यांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी खात्री करून सदर बॅग डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी मालकाला परत केली. त्याबाबतची माहिती मानपाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. बॅग परत मिळाल्याबद्दल मालकांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in