चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीची गाड्यांना धडक, कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील घटना

चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिमेच्या लालचौकी परिसरात घडली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटीची गाड्यांना धडक, कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील घटना

कल्याण : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बसने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना कल्याण पश्चिमेच्या लालचौकी परिसरात घडली. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून, बस चालकाच्या आजारपणाच्या त्रासामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणहून भिवंडीच्या दिशेने दुपारी एकच्या सुमारास ही एसटी बस चालली होती. त्यावेळी लालचौकी परिसरात बस चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि इतर वाहनांना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे लालचौकी परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या अपघातात चार गाड्यांचे नुकसान झाले असून, एक जण जखमी झाला आहे. स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in