धर्मराजा चषकावर टेंभवली संघाने कोरले नाव

प्रथम ते चतुर्थ अशा चार संघाना ट्रॉफी आणि एकूण २ लाखांचे पारितोषिक रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले
धर्मराजा चषकावर टेंभवली संघाने कोरले नाव
PM

भिवंडी : भिवंडी महापालिकेचे माजी नगरसेवक निलेश चौधरी यांनी आयोजित केलेल्या टेनिस क्रिकेटच्या धर्मराजा चषकात सिने अभिनेत्री कुलकर्णीसह गौतमी पाटीलने हजेरी लावत स्पर्धेला रंगत आणली. दरम्यान, रविवारी या स्पर्धेचा अंतिम टप्पा पार पडला. तालुक्यातील साई सिद्ध टेंभवली संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय म्हसोबा दिवे संघाला ३ चेंडू राखून पराजित करून धर्मराजा चषकावर नाव कोरले. तर प्रतिक पाटील हा या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू ठरला. त्याला दुचाकी आणि चषक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रथम ते चतुर्थ अशा चार संघाना ट्रॉफी आणि एकूण २ लाखांचे पारितोषिक रोख रक्कम स्वरूपात देण्यात आले. या स्पर्धेच्या कालावधीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, उद्योजक बाळ्या मामा म्हात्रे, भाजपाचे संतोष शेट्टी, अॅड.हर्षल पाटील, राष्ट्रवादीचे गणेश गुलाबी, साईनाथ (भाऊ) पवार, विराज पवार, विठोबा बिल्ला नाईक आदींनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेची शोभा वाढवली, तर धर्मराजा ग्रुप आणि वऱ्हाळदेवी स्पोर्ट्सने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

logo
marathi.freepressjournal.in