आता कर्करोगाच्या निदानासाठी व्हॅन उपलब्ध होणार

व्हॅन खरेदी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली
आता कर्करोगाच्या निदानासाठी व्हॅन उपलब्ध होणार

कर्करोगाच्या लवकर निदानासाठी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे आठ कर्करोग निदान व्हॅन उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये ठाणे परिमंडळाचा समावेश असून कर्करोगाचे लवकर निदान करणे शक्य होणार असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. या व्हॅन खरेदी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्यात मौखिक, स्तन आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग याचे रुग्ण जास्त आढळून येतात. या तीनही कर्करोगांमध्ये वेळेत व लवकर निदान आणि उपचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. आरोग्य विभागामार्फत नियमतीपणे सर्वेक्षणाद्वारे संशयित कर्करुग्ण शोधले जातात. त्यांचे निदान निश्चितीसाठी बायोप्सी करणे आवश्यक असते.

सर्वेक्षणाद्वारे आढळलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु बरेचसे रुग्ण वेळेत बायोप्सी करून घेत नाही. असा रुग्णांना त्यांच्या जवळच्याठिकाणी बायोप्सी तपासणी केल्यास कर्करोगाचे निदान लवकर होऊन वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. त्यासाठी विभागाने ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अकोला आणि नाशिक या परिमंडळात प्रत्येकी एक कर्करोग निदान वाहन घेण्यास मंजूरी दिली आहे. वाहनासोबतच तपासणीसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या उपकरणांच्या खरेदीसाठी आणि तज्ज्ञ मनुष्यबळासाठी देखील मंजूरी देण्यात आली आहे. यासंदर्भात दि. १० जून रोजी आरोग्य विभागाने शासन निर्णय पारित केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in