वजीर सुळक्यावर श्रीरामाचे चित्र असलेला भगवा रोवला

वांद्रे गावातून गिर्यारोहणाची सुरुवात करत सुमारे ३००० फूट उंच असलेला सुळक्याच्या पायथ्याशी श्री रामांची विधिवत पूजा करत या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
वजीर सुळक्यावर श्रीरामाचे चित्र असलेला भगवा रोवला

कल्याण : कल्याण येथील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर सुळक्यावर भगवा रोवत श्रीराम मंदिराचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. वजीर सुळका म्हणजे ९० अंश कोणात उभा असलेला आणि सुमारे ३०० फूट उंच असलेला एक सुळका. वजीर सुळक्याच्या माथ्यावरून श्रीरामाचा भगवा ध्वज लागल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सदर विशेष मोहिमेत संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, सुहास जाधव, सुनील खनसे, अभिजीत कळंबे, स्वप्नील भोईर, प्रशील अंबाडे, राहुल घुगे यांनी सहभाग नोंदवून हा विक्रम करून दाखवला.

वांद्रे गावातून गिर्यारोहणाची सुरुवात करत सुमारे ३००० फूट उंच असलेला सुळक्याच्या पायथ्याशी श्री रामांची विधिवत पूजा करत या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम कल्याणकरांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली. बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका. थोडी जरी तांत्रिक चूक झाली की, जीवाला मुकावे लागणार असल्याने मृत्यूची भीती कायम. त्यात अशा अतिकठीण सुळक्यावर कल्याणकरांनी भगवा ध्वज लावल्याने सर्वत्र सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर संघाचे कौतुक करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in