कल्याण-डोंबिवली : प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा खुलासा, पोलिसांनी 24 तासांत घातल्या बेड्या

पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिल्याची घटना कल्याणमधील आडवली येथे घडली.
कल्याण-डोंबिवली : प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा खुलासा, पोलिसांनी 24 तासांत घातल्या बेड्या

डोंबिवली : पत्नीने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह दगडाला बांधून विहिरीत फेकून दिला होता, असा खुलासा झाला आहे. ही घटना कल्याणमधील आडवली येथे घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या खून प्रकरणाचा तपास मानपाडा पोलिसांनी चोवीस तासांत केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिटा लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी (३२) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. २५ तारखेला आडिवली येथील नेताजीनगर संकुलातील विहिरीतून अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने गळा चिरल्यानंतर कमरेला दोरी व तारेने दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकून दिला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मरेकऱ्यांचा शोध घेत होते. मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक होनमाने व पोलीस पथकाने तपास सुरू केला. पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या हरवलेल्या तक्रारीची माहिती घेतली.

चंद्रप्रकाश हा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना यात संशय आल्याने मृताची पत्नी रिटाची चौकशी केली. चौकशीत रिटाने आडिवली येथील सुमित विश्वकर्मा याचा उल्लेख केला. यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता चंद्रप्रकाश यांच्या हत्येचे गूढ उकलले.

logo
marathi.freepressjournal.in