महिलेने केली व्याह्याची गळा चिरून हत्या

कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून विहीणला पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेने केली व्याह्याची गळा चिरून हत्या

भिवंडी : व्याह्यासोबत लॉजवर मुक्कामासाठी गेलेल्या एका महिलेने संपत्तीच्या वादातून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने विहिणीने धारदार चाकूने व्याह्याची गळा व पोट चिरून निर्घृण हत्या केली. ही घटना कल्याण- भिवंडी मार्गावरील पिंपळासघर गावच्या हद्दीत असलेल्या कॉस्मो लॉजमध्ये घडली.

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून विहीणला पोलिसांनी अटक केली आहे. शगुप्ता बेगम रफिक बेग उर्फ शबीना असे अटक विहीणचे नाव आहे, तर अल्लाबक्ष शेख असे निर्घृण हत्या झालेल्या व्याहीच नाव आहे. आरोपी शगुप्ता आणि मृतक अल्लाबक्ष नात्याने विहीण-व्याही असून, या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याने ते दोघेही मुक्कामासाठी १३ जानेवारी रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास कल्याण - भिवंडी मार्गावरील पिंपळासघर गावच्या हद्दीत असलेल्या कॉस्मो लॉजमध्ये आले होते.

त्यावेळी त्यांनी या लॉजमधील पाहिल्या मजल्यावरील रूम नंबर २०६ बुक केली. त्यानंतर दोघेही लॉजच्या रुममध्ये असताना दोघांमध्ये संपत्तीचा वाद निर्माण होऊन वाद झाला; मात्र हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी विहीणने व्याहीच्या गळ्यावर व पोटावर धारदार चाकूने वार करून त्याला जागीच ठार मारले. दरम्यान, घटनेची माहिती कोनगाव पोलीस पथकाला मिळताच पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर लॉज मॅनेजर रवींद्र शेट्टी (४९) यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून शगुप्ता हिला ताब्यात घेऊन अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in