उल्हासनगर : बँकेच्या कारभारावर नाराज असल्याने तरुणाने पसरवली बॉम्बची अफवा

हा तरुण बी.कॉमचा विद्यार्थी असल्याचे समोर आले असून बँकेच्या कारभारावर नाराज असल्याने त्याने ही अफवा पसरवली
उल्हासनगर : बँकेच्या कारभारावर नाराज असल्याने तरुणाने पसरवली बॉम्बची अफवा

उल्हासनगर : उल्हासनगर येथील एका बँकेत बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या तरुणाला घटनेनंतर काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत हा तरुण बी.कॉमचा विद्यार्थी असल्याचे समोर आले असून बँकेच्या कारभारावर नाराज असल्याने त्याने ही अफवा पसरवली असल्याचे सांगितले.

सकाळच्या सुमारास एका तरुणाने उल्हासनगर नियंत्रण कक्षाला फोन करून नेहरू चौकात असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण बँकेची झडती घेतली, मात्र बॉम्ब सापडला नाही. मोबाईल लोकेशननुसार बॉम्ब ठेवल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले की, खोटी अफवा पसरवणारा तरुण केवायसी करण्यासाठी बँकेत गेला होता, मात्र बँक कर्मचाऱ्यांच्या कामावर तो नाराज होता, त्यामुळे त्याने असे केले असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in