कारची काच फोडून रोख रकमेची चोरी

अज्ञात चोरट्याने पार्किंग केलेल्या कारची काच फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना कोनगाव परिसरातून उघडकीस आली आहे.
कारची काच फोडून रोख रकमेची चोरी

भिवंडी : अज्ञात चोरट्याने पार्किंग केलेल्या कारची काच फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना कोनगाव परिसरातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास दर्शन रमेश पाटील याने त्याची वॅगनर कार क्र. एमएच ०४ के.डी ३२४१ ही कोनगाव युवांश अपार्टमेंटच्या पाठीमागील कबड्डी मैदानात पार्क करून ठेवली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारच्या पुढील डाव्या बाजूची काच फोडून लाल रंगाच्या कापडी बॅगमधील १ लाख ४४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोह ए.पी.गोरले करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in