डोंबिवलीत रात्रीतून लाखो किमतीच्या दरवाजांची चोरी; महिलांविरोधात गुन्हा

रात्रीच्या वेळी रस्त्यात फिरून अल्युमिनियम-फायबर बनावटीचे लाखो किमतीचे दरवाजे चोरणाऱ्या महिलांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीत रात्रीतून लाखो किमतीच्या दरवाजांची चोरी; महिलांविरोधात गुन्हा
Published on

डोंबिवली: रात्रीच्या वेळी रस्त्यात फिरून अल्युमिनियम-फायबर बनावटीचे लाखो किमतीचे दरवाजे चोरणाऱ्या महिलांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात पाच महिला निवासी भागातील कामत हॉस्पिटल (प्लॉट पी-६९) मधील आवारात ठेवलेले अडीच बाय साडेसहा फुटाचे सात अल्युमिनियम/फायबर बनावटीचे किमती दरवाजे चोरत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या महिला मोठे कापडी पोते घेऊन भंगार गोळा करीत असताना चोरी करत असल्याचे चोऱ्या करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in