उरणच्या शनिमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

या मंदिरात यापूर्वी अनेकवेळा दानपेटी फोडण्याच्या आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत.
उरणच्या शनिमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

उरण : उरण शहरातील आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या शनिमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली आणि यातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मंदिरात यापूर्वी अनेकवेळा दानपेटी फोडण्याच्या आणि चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी करणारे सीसीटीव्हीत कैद झाले असून बहुतेक वेळा हे चरसी, नशेबाज चोर असल्याने पोलीस देखील त्यांना काही करू शकत नाही आणि त्यांना सोडून देण्यात येते. त्यामुळे या मंदिरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in