
शिवसेना हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष कसा चालवायचा हे त्यांना माहित आहे आणि ते सक्षमही आहेत. त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण, आमच्या आदरणीय नेत्यांवर टीका केली तर ती खपवून घेतली जाणार नाही. पवारसाहेबांवर टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी आपली लायकी तपासावी आणि नंतरच टीका करावी, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
एकनाथ शिंदे समर्थकांनी आज शक्तिप्रदर्शन केले . यावेळी खा. श्रीकांत शिंदे आणि मा. महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी केलेल्या टीकेवर आनंद परांजपे यांनी आक्रमक होऊन प्रत्युत्तर दिले. परांजपे म्हणाले की, खा. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर बेताल आणि बेछूट आरोप केले. खरंतर खा. शिंदे हे अपरिपक्व आहेत, हे आपणाला माहित होते. पण, त्यांना ठाणे जिल्ह्यातील राजकारणाविषयी पूर्ण माहिती नाही, हेदेखील आता त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. नरेश म्हस्के म्हणाले की राष्ट्रवादीचे नगरसेवक त्रास द्यायचे. पण, प्रत्येक महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना न बोलू देणे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना न बोलू देणे, विकास कामांमध्ये राजकारण करणे, किंबहुना कोरोनाकाळात लसीकरणातही राजकारण करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लस कमी देणे अशा प्रकारचे घाणेरडे राजकारणही म्हस्के यांनी केले. सध्या शिवसेनेत जे चालू आहे.