अंबरनाथमधील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक

अंबरनाथमध्ये शनिवारी दुहेरी हत्याकांड झाले होते. ज्यात सूरज परमार आणि सुरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती.
अंबरनाथमधील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक
Published on

उल्हासनगर : अंबरनाथमधील दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा सोसायटी आहे. येथे शनिवारी २ तरुणांचा मृतदेह सापडला होता, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छाया रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा तपास करत ३ आरोपींना अटक केली आहे.

अंबरनाथमध्ये शनिवारी दुहेरी हत्याकांड झाले होते. ज्यात सूरज परमार आणि सुरज कोरी यांची हत्या करण्यात आली होती. या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, घटनेतील आरोपी चंद्रशेखर बिराजदार यांच्या घरा समोरील पाण्याची मोटर चोरी करताना चंद्रशेखर यांनी बघितले आणि त्यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि दोघांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ज्यात त्यांचा अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिराजदार, विठ्ठल बिराजदार आणि अजित राठोड या तिघांना अटक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in