टीजेएसबी सहकारी बँकेला तीन पुरस्कार; इंडियन बँक्स असोसिएशनकडून गौरव

कार्यक्रमात सहभागी झालेल्या बँकिंग, फायनान्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेचे विशेष कौतुक केले.
टीजेएसबी सहकारी बँकेला तीन पुरस्कार; इंडियन बँक्स असोसिएशनकडून गौरव

ठाणे : देशातील नागरी सहकारी बँकांतील अग्रणी असलेल्या मल्टीस्टेट टीजेएसबी सहकारी बँकेला इंडियन बँक्स असोसिएशन या बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेने सन्मानित केले आहे. टीजेएसबी सहकारी बँकेची तंत्रज्ञान पूरक सुलभ ग्राहकसेवेच्या प्रभावी कामगिरीची दखल घेऊन इंडियन बँक्स असोसिएशनने तीन पुरस्कार दिले आहेत.

टीजेएसबी सहकारी बँकेला बेस्ट डिजिटल सेल्स, पेमेंट आणि एंगेजमेन्ट यासाठी प्रथम पुरस्कार, बेस्ट टेक टॅलेंट आणि ऑर्गनायझेन यासाठी प्रथम पुरस्कार आणि बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ दि इयरसाठी व्दितीय पुरस्कार शुक्रवार, नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुंबई, नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात देण्यात आले.

टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालिका, मुख्य कार्यकरी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली यांनी हे पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी संकर यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी बँकेच्या आयटी विभागाचे, डिजिटल कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बँकिंग, फायनान्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रसह गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या पाच राज्यातून १३८ शाखांतून टीजेएसबी सहकारी बँक कार्यरत आहे. बँकेचा एकूण व्यवसाय २१ कोटींचा आहे. निव्वळ नफा रुपये १७३ कोटींचा आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in