मध्य रेल्वेवर तीन प्रवाशांचा ऐवज लंपास

मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, झोपेचा व गर्दीचा फायदा घेत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली.
मध्य रेल्वेवर तीन प्रवाशांचा ऐवज लंपास
मध्य रेल्वेवर तीन प्रवाशांचा ऐवज लंपास'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : मध्य रेल्वेवरील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, झोपेचा व गर्दीचा फायदा घेत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रोख रक्कम, दागिने, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास करण्यात आली. या तिन्ही प्रकरणांत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मीरारोड येथील नजमा मोहम्मद हसनैन जैदी या बिदर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत असताना ठाणे स्थानकात त्यांच्या सीटखालील बॅगेची चेन उघडी आढळली. त्यातील सोन्याचे मंगळसूत्र, नाकातील दागिना, घड्याळ, ओळखपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि ८ हजार रुपयांची रोकड असा सुमारे २१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

दुसऱ्या घटनेत साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात झोपलेल्या उल्हास आवारे यांची कपडे, स्मार्ट वॉच व कागदपत्रे असलेली ८ हजार १०० रुपयांची बॅग चोरट्याने लंपास केली. तर कल्याण-सीएसएमटी लोकलमधून प्रवास करणाऱ्या वैभव वनकुद्रे यांची दोन मोबाईल, रोकड व कागदपत्रांसह १७ हजार ५०० रुपयांची सॅकबॅग चोरीला गेली. तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in