दुर्दैवी! बारवी नदीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांनी गमावला जीव

सध्या उकाडा वाढला असल्याने पर्यटक आणि तरुणांचा ओढा हा नैसर्गिक जलप्रवाहांकडे पोहण्यासाठी वाढला आहे. त्यात अंबरनाथ तालुक्यात चिखलोली, उल्हासनदी तसेच बारवी धरण आणि विविध खदानीमध्ये पोहण्यासाठी तरुण जात असतात.
दुर्दैवी! बारवी नदीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांनी गमावला जीव

बदलापूर : बदलापूरजवळील बारवी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या अंबरनाथ येथील तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी संध्याकाळी समोर आली आहे. या या घटनेने तिन्ही तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सध्या उकाडा वाढला असल्याने पर्यटक आणि तरुणांचा ओढा हा नैसर्गिक जलप्रवाहांकडे पोहण्यासाठी वाढला आहे. त्यात अंबरनाथ तालुक्यात चिखलोली, उल्हासनदी तसेच बारवी धरण आणि विविध खदानीमध्ये पोहण्यासाठी तरुण जात असतात. अशाच प्रकारे बुधवारी दुपारी अंबरनाथ पश्चिमेतील घाडगे नगर परिसरात राहणारे तिकेश मुरगु (२३) सुहास कांबळे आणि युवराज हुली (१८) हे तिघे मित्र बदलापूरजवळील बारवी धरणाच्या प्रवाहातील बारवी नदीत पोहण्यासाठी गेले होते; मात्र यावेळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने युवराज पाण्यात बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी सुहासने धाव घेतली; मात्र युवराज आणि सुहास दोघेही बुडत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेला तिकेशही पाण्यात बुडाला. त्यामुळे एकमेकांना वाचवण्यासाठी गेलेल्या या तिन्ही मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तिन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले होते. हे तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि गोविंद पाटील यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in