मुंब्रामध्ये तीन लाख ३५ हजारांची घरफोडी

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला
मुंब्रामध्ये तीन लाख ३५ हजारांची घरफोडी

ठाणे : मुंब्रा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा उपद्रव माजवत हनुमाननगर भागातील एका घरात घरफोडी करून तब्बल तीन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा येथील हनुमान नगर भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय तक्रारदार महिला यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे लॉक तोडून प्रवेश मिळवला. यावेळी घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने मुंब्रा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in