हल्ला करून लूट करणारे तिघे चोरटे अटकेत

हल्ला करून लूट करणारे तिघे चोरटे अटकेत

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Published on

डोंबिवली : मारहान करून जबरी चोरी करणा-या तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.अटक केलेल्या चोरट्यांवर मानपाडा व कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.पोलिसांनी चोरट्यांकडून तीन मोटारसायकल व पाच मोबाईल फोन असा एकूण १,७७,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , नावीर इन्सफअली शेख ( रा. उल्हासनगर) २) प्रेमकुमार घनश्याम गोस्वामी (रा. आर.एस. कॉलनी, आंबिवली ) ३) सुरण दिलीप विश्वकर्मा ( रा. आर. एस. कॉलनी आंबवली ) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. फिर्यादी भिम रामेश्वर सिंग २८ मे रोजी रात्री २ सुमारास कामाहुन घरी स्कूटरने घरी जात होते. चोरट्यांनी काका धाब्याजवळ, श्री मलंग रोड, नांदिवली रोड वरील काका धब्याजवळ सिंग हे येताच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात जोराचा फटका मारून जखमी केले.सिंग यांची स्कुटर व पैसे घेवून पळून गेले.
फिर्यादी अक्लेश रामचंद्र चौधरी यांनी ११ जून रोजी रात्री २ वाजता सुमारास कामाहून घरी परतत डोंबिवली पूर्वेकडील देशमुख होम्स कमानी जवळ आले.सदर ठिकाणी चोरट्यांनी चौधरी यांच्यावर चाकुने वार त्यांच्याकडील मोबाईल फोन व पाकीट घेऊन पळून गेले.याप्रकरणी चौधरी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले.अटक केलेले चोरटे हे एन आर सी कॉलनी मोहने गाव आंबिवली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून तिघा चोरट्यांना पकडून गजाआड केले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त जयजित सिंह, पोलिस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले (गुन्हे), पोलिस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे) , सहा पोलिस आयुक्त निलेश सोनवणे (गुन्हे शोध) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पोलिस उप निरीक्षक मोहन कळमकर, पोलिस उप निरीक्षक संजय माळी पोहवा विश्वास माने- कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रविण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडु गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे गुरुनाव जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे चालक पोहवा बोरकर यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in