१२ महिन्यांत १२ कोटींचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई

महाराष्ट्रत अनेकवेळा परराज्यातील मद्य चोरून आणले जाते. यांत विशेष करून गोवा, दीव-दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. हे मद्य खासगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणले जाते. त्यामुळे गुजरात, गोवा आदी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाईंग स्कॉर्डची विशेष नजर असते.
१२ महिन्यांत १२ कोटींचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे १२ कोटींहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये पाच कोटी २९ लाखांचा विविध मद्यसाठ्यांचा समावेश आहे. तर २ हजार २१७ जणांना अटक करण्यात आली आहे. यांत एकूण ३ हजार ३१३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रत अनेकवेळा परराज्यातील मद्य चोरून आणले जाते. यांत विशेष करून गोवा, दीव-दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणत समावेश असतो. हे मद्य खासगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणले जाते. त्यामुळे गुजरात,

गोवा आदी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाईंग स्कॉर्डची विशेष नजर असते. महत्वाची बाब म्हणजे अनेकवेळा गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबिले जातात. यामध्ये दुधाच्या किटलीत वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते. काहीवेळा लॅपटॉपच्या बॅगमधूनही त्याची नेआण केली जाते. काहीवेळा तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीच्या दारू तयार केली जाते तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यात वर्षभरात विविध ठिकाणी ही कारवाई केली आहे.

अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्कॉर्डने कंबर कसली होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्याशी संपर्क साधला असता. ते म्हणाले की मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आमच्या विभागाने कारवाई केली. त्यात १२ कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

३ हजार ३१३ गुन्हे दाखल

१ एप्रिल २०२३ ते २९ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत या पथकाने रसायन, हातभट्टीची दारू, देशी मद्य , विदेशी मद्य, बिअर, ताडी, काळा गुळ, नवसागर आदी पाच कोटी २९ लाखांच्या मद्यसाठा तर वाहने, बोटी आदी मिळून १२ कोटी ३८ लाख ६७ हजार २३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २ हजार ८० वारस गुन्हे तर १ हजार २३३ बेवारस गुन्हे दाखल आहेत. यात २ हजार २१७ जणांना अटक झाली आहे. १०४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in