छत्री दुरूस्ती कारांगीरांवर उपासमारीची वेळ

छत्री दुरूस्ती कारांगीरांवर उपासमारीची वेळ

संपुर्ण जून महिना कोरडा गेल्याने या छत्री दुरूस्ती करणाऱ्या कारांगीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुसळधार पाऊस सुरु झाला की, छत्री रेनकोट आदींच्या वस्तूंची खरेदी व दुरुस्ती हे दर वर्षी ठरलेले असते. राज्यात जून महिन्यापासून पावसाला सुरूवात होते. बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि नवनव्या डिझाइनच्या छत्र्या १०० रूपयांपासून विकायला असतात त्यामुळे जूनी झलेली छत्री पुन्हा दुरूस्ती करून वापरण्यापेक्षा नवीन छत्रीचा मोह लोकांना आवरता येत नाही.

पहिल्याप्रमाणे तारांच्या छत्र्या या जवळ जवळ नामशेष झाल्या असल्याने या कारागीरांकडे ग्राहक फिरकत नाही. तसेच रेनकोट, जॅकेट्स यामुळे छत्री वापरणे कमी झाले आहेत. तसेच संपुर्ण जून महिना कोरडा गेल्याने या छत्री दुरूस्ती करणार्या कारांगीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उरण शहरामध्ये राजपाल नाका, आनंद नगर, गांधी चौक, राजपाल नाका, मंगल जनरल स्टोअर समोर, गांधी चौक आदी ठिकाणी कारागीर कामात मग्न झाल्याचे पहायला मिळत आहेत. मागील दोन दिवस उरण तालुकासह सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपले.आठ महिने अडगळीत ठेवलेली छत्री पाऊस सुरु झाला की आपोआपच बाहेर येते. बाजारात चायना मार्केटमधील स्वस्त यूज अॅंड थ्रो छत्र्या मिळत असल्याने जून्या छत्र्या दुरूस्तीकरण्याकडे लोक जास्त लक्ष देत नाही. यामुळे छत्र्या दुरूस्ती करणार्या कारागीरांची संख्या खूप कमी झालेली पहायला मिळत आहे.

बाजारात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक आणि नवनव्या डिझाइनच्या छत्र्या १०० रूपयांपासून विकायला असतात त्यामुळे जूनी झलेली छत्री पुन्हा दुरूस्ती करून वापरण्यापेक्षा नवीन छत्रीचा मोह लोकांना आवरता येत नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in