धमक्यांना कंटाळून युवकाची हत्या ;तीन जणांना सहा तासांत अटक

तीन जणांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न जुमानता वाहनाचा वेग वाढवून ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
धमक्यांना कंटाळून युवकाची हत्या ;तीन जणांना सहा तासांत अटक

कर्जत : कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ही हत्या करणाऱ्या तीन जणांना पळून जात असताना पोलिसांनी केवळ सहा तासांत अटक केली असून, हे तिघेही वेणगाव मधीलच आहेत. ही हत्या दहशत आणि धमक्यांना कंटाळून केल्याचे समजते.

हत्या झालेला कुणाल अरुण आमरे याने 'दहशत' नावाचा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवरून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार त्याने सुरू केले होते. त्याच्या वाढलेल्या या कारवायांची तक्रार देण्यास देखील ग्रामस्थ घाबरत असत. याचाच फायदा घेऊन त्याने गावात दहशत निर्माण केली होती. एका महिलेच्या प्रकरणावरून माजी उपसरपंच गणेश पालकर आणि कुणाल आमरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी गणेशला समजावून घरी पाठवले होते; मात्र थोड्या वेळाने कुणाल चाकू  घेऊन गणेशाच्या कार्यालयात घुसला होता.

मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आमरे या २८ वर्षीय तरुणीची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली होती. पूर्व वैमनस्य आणि रोजच्या धमक्यांना कंटाळून गणेश पालकर, प्रल्हाद सावंत व राकेश चौधरी यांनी हे लपून बसले होते. या घटनेची माहिती कर्जत पोलिसांनी खालापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवली. हत्या करणारे तिघे लोणावळ्याच्या दिशेने पळून जाण्याचा तयारीत असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना पकडण्यासाठी सापळा रचला. जीपने पळून जात असलेल्या तीन जणांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न जुमानता वाहनाचा वेग वाढवून ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

logo
marathi.freepressjournal.in