ठाण्यात ‘टीएमटी’चा थांबा मध्यरात्रीतच गायब

नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षांपासून टीएमटी बसचा थांबा होता. या थांब्यावर शालेय विद्यार्थी, रहिवासी आणि नागरिकांची चढउतार होते.
ठाण्यात ‘टीएमटी’चा थांबा मध्यरात्रीतच गायब
Published on

ठाणे : नौपाड्यातील ए. के. जोशीजवळ असलेल्या टीएमटी बस स्टॉपचा थांबा दोन वेळा गायब केल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी घडली असतानाच, गुरुवारी मध्यरात्री नौपाड्यातील आईस फॅक्टरीजवळचा बसथांबा मध्यरात्रीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर घटनेबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे.

नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षांपासून टीएमटी बसचा थांबा होता. या थांब्यावर शालेय विद्यार्थी, रहिवासी आणि नागरिकांची चढउतार होते. नौपाड्यात ये-जा करण्यासाठी हा थांबा महत्त्वाचा होता. या थांब्यावर आलेल्या प्रवाशांना शुक्रवारी सकाळी धक्का बसला. या ठिकाणचा थांबा मध्यरात्रीतच गायब करण्यात आला होता.

या घटनेची माहिती काही नागरिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना दिली. याप्रसंगी परिवहन सेवेतील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता हा थांबा परिवहन प्रशासनाकडून काढण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in