
कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर दीड वर्षांपासून ७ जण अत्याचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याच परिसरामध्ये राहणारे हे सात तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते हे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे सात जणांना पीडितेची मैत्रीण मदत करत होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आठ जणांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, संशयित आरोपींमध्ये काहीजण कल्याणमधील धनदांडग्या बिल्डरची मुले असल्याची माहिती समोर येत आहे.