शहाड पुलावर वाहतूककोंडी; पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

शहाड पुलावर वाहतूककोंडी; पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात माळशेज घाट, भीमाशंकर आदी ठिकाणी जात असतात. यामुळे शहाड उड्डाणपुलावर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी होते.
Published on

उल्हानगर : रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात माळशेज घाट, भीमाशंकर आदी ठिकाणी जात असतात. यामुळे शहाड उड्डाणपुलावर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पावसाळा सुरू झाला असून नागरिक शनिवार तसेच रविवार या सुट्टीच्या दिवशी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाट तसेच पुण्याकडे तसेच भीमाशंकर अशा ठिकाणी फिरायला जातात. मात्र रविवारी फिरायला गेलेले लोक जेव्हा परतीला येतात. त्यावेळेस कल्याण,अंबरनाथ व बदलापूर जाण्यासाठी उल्हासनगरच्या शहाड ब्रिजजवळ संध्याकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे वाहनचालकांना तसेच प्रवाशांना तासनतास वाहतूककोंडीत अडकून रहावे लागते. वाहनचालकांना पर्यायी रस्ता म्हणून कल्याणला जाण्यासाठी गोवेली - टिटवाळा - आंबिवली - कल्याण या रस्त्याचा वापर करावा. अंबरनाथला जाण्यासाठी रायता पूलमार्गे तीन झाडीहून अंबरनाथ या रस्त्याचा वापर करावा तसेच बदलापूर जाण्यासाठी रायताहून दहागांव मांजर्लीमार्गे बदलापूर या रस्ताचा वापर करावा. जेणेकरून शहाड ब्रिज याठिकाणी वाहतूककोंडी होणार नाही तसेच घरी जाण्यासाठी उशीर होणार नाही, असे आवाहन उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in