अंबरनाथमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई; ३ महिन्यांत ८२ लाखांचा दंड

अंबरनाथ शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांवर गेली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर व त्यांच्या पथकाने विना हेल्मेट, सीट बेल्ट, ड्रंक अँड ड्राईव्ह, काळी काच आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली आहे.
अंबरनाथमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई; ३ महिन्यांत ८२ लाखांचा दंड
Published on

अंबरनाथ : कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही अंबरनाथ वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई करत गेल्या ३ महिन्यांत ८२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

अंबरनाथ शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांवर गेली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर व त्यांच्या पथकाने विना हेल्मेट, सीट बेल्ट, ड्रंक अँड ड्राईव्ह, काळी काच आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांत वाहतूक विभागाने सुमारे ८६५० गुन्ह्यांची नोंद करून ८२ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. अंबरनाथ वाहतूक विभागाकडे उल्हासनगर कॅम्प ५, अंबरनाथ आणि बदलापूर तीन शहरांची जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या परिसरात त्यांच्याकडे केवळ २० ते २२ कर्मचारी आहेत; मात्र त्यानंतरही नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे.

रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्क गाड्या जप्त करणार

यापुढे रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवण्यात येत असलेल्या बसेस व इतर मोठ्या वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितले. शहरातील इतर वाहतूक नियोजनाचाही गांभीर्याने विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in