थायलंडमधील महिलांची उल्हासनगरात तस्करी; १५ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात खंडणीविरोधी पथकाने एका मोठ्या आणि धाडसी कारवाईत थायलंडमधून फसवणूक करून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या १५ महिलांची सुटका केली आहे.
थायलंडमधील महिलांची उल्हासनगरात तस्करी; १५ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात खंडणीविरोधी पथकाने एका मोठ्या आणि धाडसी कारवाईत थायलंडमधून फसवणूक करून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या १५ महिलांची सुटका केली आहे. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी उल्हासनगरातील १७ सेक्शन परिसरात असलेल्या सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे छापा मारला आणि वेश्याव्यवसायासाठी महिलांचा वापर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या महिलांची तस्करी करून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. या मोठ्या कारवाईने उल्हासनगरमधील वेश्याव्यवसायाचे जाळे उघडकीस आले असून, पोलिसांच्या या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये महिलांना थायलंडमधून चांगल्या आर्थिक मिळकतीचे आमिष दाखवून भारतात आणले जात होते आणि उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी धाडसी कारवाई करून या महिलांची सुटका केली.

मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला. सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे झालेल्या या छाप्यामध्ये पोलिसांनी १५ थायलंड महिलांना ताब्यात घेतले. त्यांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि नंतर महिलांना मदत करणाऱ्या संस्थांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. घटनास्थळावरून ५ लाख २७ हजार रुपये रोख, ग्राहकांची नोंद असलेली वह्या, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईत सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग ( ३७) आणि त्याचे चार सहकारी यांना अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in