१६ आठवड्याचा गर्भ नष्ट केल्याची संतापजनक घटना

डॉ. धुमाळ यांना न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली
१६ आठवड्याचा गर्भ नष्ट केल्याची संतापजनक घटना

पेण तालुक्यामधील दादर सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरेडी येथे राहणाऱ्या फिर्यादी लग्नानंतर गरोदर राहिल्याचे समजल्याने तिच्या संमती शिवाय पती, नणंद, सासू यांनी संगनमत करून १६ आठवड्याचा गर्भ नष्ट केल्याची संतापजनक घटना पेण तालुक्यातील जोहे गावात घडली आहे. याप्रकरणी डॉक्टरसह, पती व सासूला पोलिसांनी गजाआड केले आहे. डॉ. धुमाळ यांना न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेण तालुक्यातील वरेडी येथील महीलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पती-पत्नी, सासू-सून मध्ये भांडणे होऊ लागली. मारझोड तसेच उपाशी ठेवून क्रुरतेची वागणूक देण्यात येत होती. लग्नानंतर सदर महिला गर्भवती राहिली.

सदरचा गर्भ १६ आठवड्याचा झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांच्या दवाखाण्यात उपचारार्थ नेले. यावेळी सदर गर्भवती महिलेची इच्छा नसतांना देखील सदर महिलेचा गर्भपात करण्यात आला.

याप्रकरणी डॉ. शेखर धुमाळ यांनी मेडीकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट १९७१ चे पालन न करता गर्भपात घडवून आणल्याने डॉ. धुमाळ यांच्या विरोधात दादर सागरी पोलिस ठाण्यात पिडीत महीलेने गुन्हा दाखल केला.

logo
marathi.freepressjournal.in