भिवंडी: शंभर रुपयांसाठी तृतीयपंथीयांची केक दुकानदाराला मारहाण, दोघांवर गुन्हा

दोन तृतीयपंथीयांनी एका केक दुकानदाराकडे शंभर रुपयांची मागणी केली असता त्यांना दुकानदाराने नकार दर्शवल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी त्यास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना
भिवंडी: शंभर रुपयांसाठी तृतीयपंथीयांची केक दुकानदाराला मारहाण, दोघांवर गुन्हा

भिवंडी: दोन तृतीयपंथीयांनी एका केक दुकानदाराकडे शंभर रुपयांची मागणी केली असता त्यांना दुकानदाराने नकार दर्शवल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी त्यास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू व सोन्या अशी गुन्हा दाखल झालेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कामतघर परिसरातील भाग्यनगरमधील गणेश मंदिरजवळ राहणारे ज्ञानप्रकाश विनय सिंह हे त्यांच्या मालकीच्या केक गार्डन या दुकानात काम करत होते. त्यावेळी सदर आरोपींनी तिथे येऊन ज्ञानप्रकाश यांच्याकडे १०० रुपयांची मागणी केली. परंतु त्यांनी नकार देताच तृतीयपंथीयांनी शिवीगाळ करून त्यातील एकाने दुकानात शिरून ज्ञानप्रकाश यांचे डोक भिंतीवर आपटून त्यांना जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in