कर्जतमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. कर्जत शहरातून जाणाऱ्या मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने खालापूर येथील दुचाकी चालक कडाव येथे जात होता.
कर्जतमध्ये ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

कर्जत : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. कर्जत शहरातून जाणाऱ्या मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने खालापूर येथील दुचाकी चालक कडाव येथे जात होता. त्यावेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. खालापूर तालुक्यातील कांढरोली येथील धनंजय नरेश ठाकूर (वय २०) हा तरुण मित्र विशाल सीताराम वाघमारे यांच्यासोबत कर्जत मुरबाड रस्त्याने कडावकडे जात होता. कडाव येथील मुन्नालाल हा ट्रक घेऊन कर्जत बाजूकडून मुरबाड बाजूकडे घेऊन जात होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कर्जत एच पी पेट्रोल पंप येथे ट्रकने पाठीमागून जोरात ठोकर दिली. या अपघातात ट्रकचे पाठीमागील चाक स्कुटीचालक धनंजय ठाकूर याचा तेथे जागीच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in