अवैध हत्यारांच्या साठ्यासह दोन आरोपी जेरबंद

अवैध हत्यारांच्या साठ्यासह दोन आरोपी जेरबंद

रिक्षाला त्यातील दोन इसमांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, दोन लोंखडी तलवार असा हत्यारांचा साठा आढळला. अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून शिळ डायघर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शिळफाटा येथे नाकाबंदी करत असताना पोलिसांना एक रिक्षा भरधाव वेगात येत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रिक्षाला त्यातील दोन इसमांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, दोन लोंखडी तलवार असा हत्यारांचा साठा आढळला. अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे हे आपल्या पथकासह शिळफाटा येथे रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना मुंब्रा-पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली एक रिक्षा निदर्शनास आली. त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले आढळून आले. रिक्षा रोडच्या कडेला थांबवण्यास सांगून त्यातील इसमांची विचारपूस करत असताना पाठीमागे बसलेला एक संशयित इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना पोउनि/शिंदे यांनी त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कोयता, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, दोन लोखंडी तलवार असे ७ वेगवेगळ्या वर्णनाची हत्यार आढळून आले. त्याचबरोबर रिक्षाबाबत चौकशी केली असता सदरची रिक्षा अभयनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्या अनुशंगाने शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अरबाज शेख आणि गौरव उर्फ बाल्या यांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील प्राथमिक तापासात रिक्षा चोरीच्या ३ गुन्ह्यांमध्ये या दोघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in