
भाईंंदर : मीरारोड नया नगर पोलीस ठाणे हद्दीत ३ जानेवारी शुक्रवारी रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती, आरोपीने गोळी झाडल्यानंतर फरार झाला होता. त्यानंतर सदरील घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या पाच पथके व प्रत्येकी पोलीस ठाणे यांच्या पथके तैनात करण्यात आली होती. बंदुकीने गोळीबार करून खून करणाऱ्या दोन आरोपींस अटक करण्यात आली आहे. मीरारोड पूर्वेच्या शांती शॉपिंग सेटरमधील ए-विंगच्या जिन्या जवळील एका बंद दुकानाचे समोर असलेल्या सिमेंटच्या ओट्यावर बसलेल्या प्रत्यक्ष साक्षीदार ऊमर रमजान सोलंकी व यातील मयत इसम शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु हे गप्पा मारत बसले होते. मयत शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु व आरोपीत नामे मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम यांच्यातील पूर्व वैमनस्याच्या कारणावरून हत्येचा कट रचला. अनोळखी आरोपीच्या मदतीने मयत व्यक्तीच्या डाव्या डोक्यात पिस्तूलने फायर करून त्यास ठार मारले व पळ काढला.
या घटनेबाबत इसा इब्राहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारिवरून नयानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा व हत्यार कायद्या अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष- १ काशिमीरा करित असताना अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते. सदर गुन्हयांतील मिळालेल्या फुटेजचे तांत्रीक विश्लेषन वरुन व मिळालेल्या माहीतीवरुन सदर गुन्हयांतील आरोपी सैफअली मन्सुरअली खान वय-२२ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा.ठी. आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर यास दिनांक ४ जानेवारी रोजी रोजी नालासोपारा येथुन ताब्यात घेण्यात आले होते. नमुद आरोपीने सांगितल्या प्रमाणे पंचनाम्यात गुन्हा करण्यासाठी वापरलेली गावठी बनावटीची एक पिस्तुल, मॅगेझीन व ६ बुलेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील दुसरा आरोपी मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम वय ३४ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा.ठी. नयानगर, मिरारोड पूर्व, ता.जि. ठाणे ह्याला ४ जानेवारी रोजीच बदलापुर जिल्हा ठाणे येथुन ताब्यात घेण्यात आले होते. सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. तर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.