घुसखोर बांगलादेशींमधील दोघांवर बांगलादेशातील हत्या प्रकरणातील वॉण्टेड

बांगलादेशातील नरैल जिल्ह्यात कालिया पोलीस त्यांच्याशोधात असल्याचे त्या कागदपत्रांवरून दिसून आले.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

ठाणे : बेकायदा भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पनवेलमध्ये बस स्थानकाजवळ अटक करण्यात आली असून ते बांगलादेशात खून प्रकरणात तेथील पोलिसांना हवे असल्याचे त्यांच्याकडे आढळून आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

अली हाफिज शेख (२७) रबिउल मन्नन शेख (४६) व मेसन किस्लू मुल्ला (२५) अशा तिघांना पनवेलच्या एसटी बसस्थानकाजवळ १८ नोव्हेंबरला पकडण्यात आले होते. ते येथे नोकरीच्या शोधात होते. तिघांवर भारतीय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.

त्यांच्या तपासामध्ये जी कागदपत्रे मिळाली, त्याचे भाषांतर केले असता त्यात अली शेख व रबिउल शेख या दोघांवर २९ सप्टेंबर २०२३ रोजी खुनाचा गुन्हा बांगलादेशात दाखल झाला आहे. बांगलादेशातील नरैल जिल्ह्यात कालिया पोलीस त्यांच्याशोधात असल्याचे त्या कागदपत्रांवरून दिसून आले. त्यांना बागलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in