उसने पैसे मागितल्याच्या रागातून दोन बालकांची तरुणाला जबर मारहाण, लोखंडी रॉड घातला डोक्यात

उसने पैसे मागितल्याच्या रागातून दोन बालकांनी तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना...
उसने पैसे मागितल्याच्या रागातून दोन बालकांची तरुणाला जबर मारहाण, लोखंडी रॉड घातला डोक्यात
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

भिवंडी : उसने पैसे मागितल्याच्या रागातून दोन बालकांनी तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील कामतघर परिसरात घडली आहे. या मारहाणीचा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज नामधारी गौतम (१६), मिसाल गौतम (१७) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२९ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास रामनाथ जगवेम मुखिया (२७) हा तरुण त्याचा मित्र शंकरसोबत कामतघर परिसरातील फेणेगाव येथील बाबू सर्व्हिस सेंटरच्या समोर असताना रामनाथने आरोपी राजकडे उसने पैसे मागितले. दरम्यान, या गोष्टीचा राग मनात धरून राजने त्याचा मामा मिसाल यास त्या ठिकाणी बोलावून दोघांनी आपसात संगनमताने रामनाथ यास शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात घालून त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी रामनाथच्या फिर्यादीवरून दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in