
येथे रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, सायंकाळी घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग उत्तेकर (२४) आणि चेतन गोगावले (२२) अशी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे राहणारे होते. या अपघातात तरुणाचा मोबाईल फुटला असल्याने रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.