दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

या दोघांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Published on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमेकडील 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश माधवराव महाले (४०) आणि सूर्यभान नानाजी कर्डक (६०) असे कर्मचाऱ्यांचे नाव असून यातील सूर्यभान हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील एका इमारतीमधील सदनिकाना कर आकारणी करून देण्याकरिता प्रत्येक सदनिकामागे ३ हजार रुपये प्रमाणे ३६ सदनिकासाठी एक लाख आठ हजार रुपये रकमेची मागणी करून सदर रकमेपैकी ५० हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले.

logo
marathi.freepressjournal.in