गोळीबाराच्या दोन घटना; एकाचा मृत्यू, एक जखमी : संशयित अटकेत

पहाटे ५-३० वाजण्याच्या सुमारास रिक्षामधून आलेल्या त्रिकुटाने बांधकाम साइटवर दगडफेक आणि तोडफोड केली
गोळीबाराच्या दोन घटना; एकाचा मृत्यू, एक जखमी : संशयित अटकेत

सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना राज्याचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यात गणेश जाधव उर्फ (काळ्या गण्या) याचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाले आहेत. दोन्ही गोळीबारातील आरोपी बिपिन मिश्रा आणि सौरभ शिंदे हेच असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाण्याच्या घंटाळी परिसरात शुक्रवारी पहाटे ५-३० वाजण्याच्या सुमारास रिक्षामधून आलेल्या त्रिकुटाने बांधकाम साइटवर दगडफेक आणि तोडफोड केली. या तोडफोडीच्या आवाजाने उठलेले हॉटेल्सचे इतर दुकानातील कर्मचारी हे बाहेर आल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकावले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या ओम साई प्रॉपर्टी ऑफिस मधील अश्विन गमरे याच्यावर तीन राउंड गोळीबार करण्यात आला. यात अश्विन गमरे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्याच्या बरगडीला गोळी लागल्याचे सूत्रांनी माहिती दिली. या घटनेनंतर काही तासाच्या अवधीतच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची दुसरी घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मामा भाच्याच्या डोंगराखाली घडली. या गोळीबारात गणेश जाधव उर्फ ( काळ्या गण्या ) हा गंभीर जखमी झाला होता त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला

दोन्ही गोळीबारात तेच आरोपी

घंटाळीमधील अश्विन गमरे याला कळवा रुग्णालय आणि वर्तकनगरमधील गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या याला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात होते मात्र त्याचा मृत्यू झाला. घंटाळीच्या घटनेनंतर वर्तकनगरमध्ये काही तासाच्या अंतरात दुसरी घटना घडली. एकाच दिवशी घडलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये साम्य आहे. त्यामुळे घंटाळीचेच आरोपी हे वर्तकनगरमध्ये आरोपी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.

तर दोन महिन्यांत गोळीबाराच्या चार घटना

ठाण्यात दोन महिन्यात तब्बल चार गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यात गोळीबाराची एक घटना तर अॉक्टोबर महिन्यात गोळीबाराच्या तीन घटना घडलेल्या आहेत. विशेष असे की, २१ आक्टोबर रोजी एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. १७ सप्टेंबर, २०२२ रोजी अज्ञात कारणावरून लेबर कॉन्ट्रॅक्टर गणेश कोकाटे यांच्या गाडीवर पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी पहाटे ३-४५ च्या सुमारास गोल्डन डाइज नाका परिसरात घडली होत. या घटनेत कॉन्ट्रॅक्टर सुदैवाने बचावले. ८ अक्टोबर, रोजी व्यावसायातील आर्थिक देवाण-घेवणीच्या भांडणातून एका अज्ञात इसमाने रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास संदीप अडसूळ यांच्यावर गोळीबार केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in