उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका डॉक्टरसह दोघांचा मृत्यू

उल्हासनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला.
File Photo
File Photo
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला. या वेळी अपघाताचा बळी ठरला तो अवघ्या २८ वर्षांचा एक तरुण डॉक्टर.... जो आरोग्य सेवा देत होता, दुसऱ्यांचे प्राण वाचवत होता! उल्हासनगर शहरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. हनुमंत बाबुराव डोईफोडे यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास डॉ. हनुमंत डोईफोडे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यामुळे त्यांचे नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर कोसळले. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना कल्याण येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अति रक्तस्त्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. मूळचे बीड जिल्ह्यातील केज कासरी गावचे रहिवासी असलेल्या डॉ. डोईफोडे यांची वैद्यकीय सेवा अवघ्या दीड वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

अर्धवट बांधकामाच्या उघड्या नाल्यात पडून युवकाचा मृत्यू!

उल्हासनगर शहरातील विकासकामांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे आणखी एक गंभीर उदाहरण समोर आले आहे. कॅम्प नंबर ५ मधील जय जनता कॉलनी येथे सुरू असलेल्या नाल्याच्या अर्धवट बांधकामामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in