डोंबिवलीत दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू; कंपनीत केमिकलचा स्फोट झाल्याने एका कामगाराने, तर उष्णतेचा त्रास झाल्याने दुसऱ्याने गमावला जीव

डोंबिवलीत शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
डोंबिवलीत दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू; कंपनीत केमिकलचा स्फोट झाल्याने एका कामगाराने, तर उष्णतेचा त्रास झाल्याने दुसऱ्याने गमावला जीव

डोंबिवली: डोंबिवलीत शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फेज १ मधील कॅलेक्सी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) कंपनीत शुक्रवारी दुपारच्या दरम्यान केमिकलचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर कल्याण शिळ रोडवरील श्रीजी लाईफस्टाईल कंपनीत तयार झालेल्या उष्णतेचा त्रास झाल्याने पवन या कामगाराला उलट्या झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एमआयडीसी फेज-१ मध्ये कॅलेक्सी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) कंपनी आहे. या कंपनीत औषध बनविण्याचे काम केले जाते. दुपारच्या सुमारास कंपनीतील ड्रममध्ये असलेले केमिकल काढण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान केमिकलचा स्फोट झाल्याने संतोष खांबे (४७) यांचा मृत्यू झाला. केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. दुसऱ्या घटनेत कल्याण शिळ रोडवरील श्रीजी लाईफस्टाईल कंपनीत उष्णतेचा त्रास झाल्याने पवन या कामगाराला उलट्या झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in