Ulhasnagar : विजेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या २६ वर्षीय तरुणीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मध्ये घडली.
Ulhasnagar : विजेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू
Ulhasnagar : विजेच्या धक्क्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उल्हासनगर : गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या २६ वर्षीय तरुणीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मध्ये घडली. करिष्मा मधवाणी असे मृत तरुणीचे नाव असून, ती गणेशगंगा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होती.

करिष्मा गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडली होती. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पोलच्या संपर्कात ती आली. पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने करिष्माला तीव्र विजेचा धक्का बसला. ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

पोलमध्ये विद्युत प्रवाह कसा उतरला, तसेच कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in