उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी दोन्ही पक्ष बहुमतापासून दूरच राहिले. निकालानंतर झालेल्या अंतर्गत चर्चा आणि प्रभागनिहाय विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, या अपयशामागे जनतेचा रोष किंवा विरोधकांची ताकद नव्हे, तर स्वतःच्या उमेदवारांनी केलेल्या गंभीर राजकीय चुकांचा फटका बसला आहे.
उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात
उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात
Published on

नवनीत बऱ्हाटे/उल्हासनगर

उल्हासनगर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. निकालानंतरही हे दोन्ही पक्ष सत्तेच्या अत्यंत जवळ पोहोचले; मात्र बहुमताचा 'जादुई आकडा' गाठण्यात ते अपयशी ठरले. विशेष म्हणजे, या अपयशामागे विरोधकांची रणनीती नव्हे, तर पक्षांतर्गत कुरघोडी, उमेदवारांची गद्दारी, एबी फॉर्मचा गोंधळ आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेली मूक साथ ही कारणे निर्णायक ठरल्याचे आता स्पष्ट होत आहे. काही प्रभागांतील या चुकांनी संपूर्ण निवडणुकीचे गणितच बदलून टाकले.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी दोन्ही पक्ष बहुमतापासून दूरच राहिले. निकालानंतर झालेल्या अंतर्गत चर्चा आणि प्रभागनिहाय विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, या अपयशामागे जनतेचा रोष किंवा विरोधकांची ताकद नव्हे, तर स्वतःच्या उमेदवारांनी केलेल्या गंभीर राजकीय चुकांचा फटका बसला आहे. शिंदे शिवसेनेच्या बाबतीत प्रभाग क्रमांक १० मधील प्रकार पक्षासाठी मोठा धक्का ठरला. येथे शिवसेनेच्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवाराचा प्रचार न करता थेट एका अपक्ष महिला उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला. परिणामी, शिवसेनेची महिला उमेदवार पराभूत झाली, तर अपक्ष उमेदवारालाही विजय मिळवता आला नाही. या अंतर्गत फूटीमुळे शिवसेनेची एक निश्चित जागा हातातून गेली. यापेक्षा अधिक गंभीर प्रकार प्रभाग क्रमांक २० मध्ये घडला.

शिंदे गटाच्या एका उमेदवाराने आपल्या पॅनलमधील दोन अधिकृत उमेदवारांचा प्रचार पूर्णपणे टाळत दोन अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन खुलेआम पत्रक छापून प्रचार केला. या कृतीमुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले. त्याचा थेट परिणाम असा झाला की, शिंदे गटाला प्रभाग क्रमांक १९ आणि २० मिळून तब्बल सहा जागा गमवाव्या बहुमताच्या शर्यतीत ही चूक निर्णायक ठरली. लागल्या.

logo
marathi.freepressjournal.in