मंच्युरियनमध्ये आढळले पालीचे पिल्लू; उल्हासनगरातील तरुणीची प्रकृती बिघडली

उल्हासनगर येथील सुभाष टेकडी परिसरात मंच्युरियनमध्ये चक्क पालीचे मृत पिल्लू आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे मंच्युरियन खाल्ल्यामुळे एका तरुणीची प्रकृती खालावली असून तिच्यावर सध्या स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित कडक विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Published on

सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या मोना पठारे या तरुणीने सायंकाळच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरातील मोरे चायनीज भेळ सेंटरवरून मंच्युरियन घरी आणले होते. हे मंच्युरियन खात असतानाच तिला त्यात पालीचे मृत पिल्लू असल्याचे दिसून आले.

या प्रकारानंतर तरुणीने तातडीने संबंधित चायनीज विक्रेत्याकडे जाऊन जाब विचारला असता, त्याने चटणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतो, मात्र ही गोष्ट कोणालाही सांगू नको, असे सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, निष्काळजीपणा करत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेजबाबदार विक्रेत्यावर प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in