Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

अतिक्रमण हटविण्यात आलेल्या गल्लीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी आमदार निधीतून सुरू करण्यात आलेल्या नूतनीकरणाच्या कामावरून भाजप आमदार कुमार आयलानी आणि शिवसेनेचे संतोष पांडे यांच्यात भररस्त्यात शाब्दिक खडाजंगी झाली.
Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने
Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने
Published on

उल्हासनगर : अतिक्रमण हटविण्यात आलेल्या गल्लीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी आमदार निधीतून सुरू करण्यात आलेल्या नूतनीकरणाच्या कामावरून भाजप आमदार कुमार आयलानी आणि शिवसेनेचे संतोष पांडे यांच्यात भररस्त्यात शाब्दिक खडाजंगी झाली. “नगरसेवकाला विचारून काम सुरू केले का?” असा सवाल पांडे यांनी केला. त्यावर “मी आमदार आहे, मला नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही,” असे आयलानी यांनी प्रत्युत्तर दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कॅम्प क्रमांक-२ मधील गोलमैदान परिसरात निरंकारी हॉल आणि देवी महल इमारतीदरम्यान राम जपो आश्रमाकडे जाणाऱ्या गल्लीत अनधिकृतपणे दुकान उभारण्यात आले होते. याबाबत आमदार आयलानी, नगरसेविका मीना आयलानी आणि नगरसेवक नंद छापरू यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर अतिक्रमण हटविण्यात आले.

पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून आमदार निधीतून गल्लीत नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यावेळी संतोष पांडे यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा आक्षेप घेतला. पांडे यांनी अतिक्रमणाबाबत आपणही तक्रार केल्याचे सांगितले; मात्र पुराव्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर नारळ फोडून कामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि वादावर पडदा पडला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in