उल्हासनगर : नशेबाज तरुणांचा हैदोस, व्यक्तीवर जीवघेणा हल्ला!

थर्टी फर्स्टच्या जल्लोषाच्या नावाखाली नशेबाज तरुणांनी शहराच्या शांततेला गालबोट लावले आहे.
उल्हासनगर : नशेबाज तरुणांचा हैदोस, व्यक्तीवर जीवघेणा हल्ला!
Published on

उल्हासनगर : थर्टी फर्स्टच्या जल्लोषाच्या नावाखाली नशेबाज तरुणांनी शहराच्या शांततेला गालबोट लावले आहे. चिंचपाडा परिसरात नशेखोर टोळक्याने वैभव कदम या व्यक्तीवर धारदार शस्त्र आणि बियरच्या बाटल्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी रात्री वैभव कदम हे घरी परतत असताना चार ते पाच नशेबाज तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. लुटमारीच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी धारदार शस्त्र आणि बिअरच्या बाटल्यांचा वापर करून वैभव यांच्या डोक्यावर आणि शरीरावर प्राणघातक वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. वैभव कदम यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चिंचपाडा परिसरातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या घटनेच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in