उल्हासनगर : मिठाईच्या दुकानात समोशाचे पीठ पायाने तुडवले; Viral Video बघून ग्रामस्थ चिडले अन्...

उल्हासनगर कॅम्प ४ च्या आशेळेगाव प्रवेशद्वारावर हरिओम स्वीट नावाचे गेल्या १५ वर्षांपासून दुकान आहे. या मिठाईच्या दुकानात समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात.
उल्हासनगर : मिठाईच्या दुकानात समोशाचे पीठ पायाने तुडवले; Viral Video बघून ग्रामस्थ चिडले अन्...

उल्हासनगर : एका मिठाईच्या दुकानात कारागीर पायाने सामोसे बनवण्यासाठीचे पीठ तुडवीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी दुकानावर धडक देत संबंधित तळलेले पदार्थ विकण्यास दुकानदारावर बंदी आणली. तसेच गावकऱ्यांनी त्या मिठाईच्या दुकानावर धडक देत दुकानातील साहित्य दुकानदाराला फेकून देण्यास भाग पाडले.

उल्हासनगर कॅम्प ४ च्या आशेळेगाव प्रवेशद्वारावर हरिओम स्वीट नावाचे गेल्या १५ वर्षांपासून दुकान आहे. या मिठाईच्या दुकानात समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशळे गाव या दुकानातून मिठाईची खरेदी करते. काल समाज माध्यमांवर या दुकानात एक कारागीर समोसे बनविण्यासाठी पायाने पीठ तुडवत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.

बघा व्हिडिओ

या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आशेळेच्या गावकऱ्यांनी केली आहे. मागील १५ वर्षांपासून हे स्वीट मार्ट असून, अनेक गावकरी याच दुकानातून मिठाई खरेदी करत होते; मात्र या दुकानदाराने गावकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता हे दुकान या ठिकाणी चालू देणार नाही, असा देखील पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in